दुःख अंतरीचे आता ओठावरती ना येवो|
सुख इतुके की आता,दव आसवात थिजो||
लळा इतुका जगाचा,कधी कुणाला लागेल?
बंध इतुके नाजूक,तरी जपाया पाहील||
जीवा सांत्वन अपुले,आपणच करणार|
साथी सवंगडी आम्ही,उद्या पुन्हा भेटणार||
ओढ आसक्त प्रेमाची,उधळ्ती हे दिवस?
त असता,धरू अजून कुठली ती आस||
मोती मातीतले या,जरी दूर देशी गेले|
तरी या छायेत यायला,तयाचे जीव घुटमळले||
किती वरीस सरले,आता किती उराशी राहिले?
एका क्षणासाठी इथे,आम्ही कोटी जीव ओवाळले||
३० मे,२००५
सांगवी