
नियतीचा खेळ म्हणून सर्वांसाठी खपायचं,
पण एक क्षण तरी स्वतःसाठी जगायचं|
सारं संपलं म्हणत नाही घुसमटायचं,
आज मितीला तू,तुलाच सावरायचं||
तुटणारे बंधही तू अलवार सलग केलेस,
बंधनात तुटताना आज स्वतःच मरण का पत्करलेस?
एक गाण्ं सुखाचं आपणही गुणगुणायचं,
आज मितीला तू,तुलाच सावरायचं||
नसतील आज नाती नात्यात गुंतून जायला,
नसतील आज मेघही तुझ्यावर बरसायला|
आसवेच आपुली पाऊस होऊन भिजायचं,
आज मितीला तू,तुलाच सावरायचं||
आहेत अजून निखारे राखही फुलवायला,
आहेत अजून कूंचले,अपुरे ‘ते’ चित्र रंगवायला|
जळक्या वसंतातही आता पुन्हा बहरायचं,
आज मितीला तू,तुलाच सावरायचं||
२३ जून,२००४
सांगवी