Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2008

खरंच

खरंच एकतरी कारण रहायला हवं होतं, तुझ्या स्वराशिवाय माझ्या शब्दांनी गायला हवं होतं| शब्द-सूर सगळेच विखुरले, वादळापूर्वी पावसाचं गाणं तरी गुणगुणायला हवं होतं| हे रेशीमबंध नुसतेच जुळत गेले, तुझी होईन का?शेवटचं विचारायला हवं होतं| माझ्याभोवती तुझे अतृप्त श्वास घुटमळले, एकदा तरी त्यात उर भरुन जगायला हवं होतं| श्वासागणिक जुळताना मुळं रूजतंच गेली, ते उमाळे जागवायला [...]

Read Full Post »

दुःख अंतरीचे

दुःख अंतरीचे आता ओठावरती ना येवो| सुख इतुके की आता,दव आसवात थिजो|| लळा इतुका जगाचा,कधी कुणाला लागेल? बंध इतुके नाजूक,तरी जपाया पाहील|| जीवा सांत्वन अपुले,आपणच करणार| साथी सवंगडी आम्ही,उद्या पुन्हा भेटणार|| ओढ आसक्त प्रेमाची,उधळ्ती हे दिवस? त असता,धरू अजून कुठली ती आस|| मोती मातीतले या,जरी दूर देशी गेले| तरी या छायेत यायला,तयाचे जीव घुटमळले|| किती [...]

Read Full Post »

सांज माझ्या मनी…

रंग कोशातले गंधले हे तनी| प्रीत उधळीत सांज माझ्या मनी|| रक्तिमा हा नभीचा पाजळे का भूवरी? बावरी ही दिशा काजळे का अंबरी? तारका-चांदण्या असता जरी उराशी| सलते ही रात्र तुजविण उशाशी|| रात जागून कोमेजली तरीही कर्दळ खुलते| अधरावरती जरी न लाली तरी तांबडे फुटते|| कूस उलटून छळवून रात्र जाई| पेंगुळ्ली पहाट रित्या ओळीतच राही|| धुंद [...]

Read Full Post »

‘दर्दे-जलन’

लाशों के उस ढेर में और एक लाश आ पडी| मौत से पहले ही नमाजे-जनाजे पे चल पडी|| अब तक हुए दर्द को, वो अब सह ना सकी| मौला मुझें उठालो, चिल्ला के रो पडी|| न उसके हाथों मे जान थी, न आखों में रौशनी| जले हुए जिस्म से, बस चिपकी थी एक ओढनी|| जिसके [...]

Read Full Post »

‘श्रावण’

आता त्या गुलाबी थंडीतलं धुकंही हवंहवंसं वाटतं, तुझ्या स्पशातला दव कधी संपूच नये असं वाटतं, कालपर्यंत हे नुसतंच कोरडं चित्र होतं, स्वप्नातला श्रावण त्यात इतक्या लवकर बरसेल, असं वाटलंच नव्हतं… सावरता सावरता आता तूच बेधुंद केलंयस, पण आता याच धुंदीत असंच राहावंसं वाटतंय, हाच पाऊस पुन्हा-पुन्हा बरसावासा वाटतोय, शब्दप्रीतीत कवितेलाही भिजवावंसं वाटतंय. पण अशावेळी तू [...]

Read Full Post »

‘क्षण असेही…’

क्षण असेही फुलतात काही… सारे असून जवळी बोलायला शब्दच सुचत नाहीत, निश्चल ओठ शब्द सोडून नुसतेच थरथरतात, थरथरलेल्या त्या फुलावर हळूहळू दव दाटतात, दवात दडतं डोळ्यातून झरणारं मन, मिळतं तिथंच तुझ्यासाठी झुरणारं तन. क्षण असेही फुलतात काही… वाटतं तुझ्याशिवाय आयुष्याला अर्थच नाही, या टिपु-या चांद्ण्यात माझं आभाळ रितंच राही, पिठुरल्या रात्रीत माझा चंद्र कुठं हरवला [...]

Read Full Post »

‘आज मितीला’

नियतीचा खेळ म्हणून सर्वांसाठी खपायचं, पण एक क्षण तरी स्वतःसाठी जगायचं| सारं संपलं म्हणत नाही घुसमटायचं, आज मितीला तू,तुलाच सावरायचं|| तुटणारे बंधही तू अलवार सलग केलेस, बंधनात तुटताना आज स्वतःच मरण का पत्करलेस? एक गाण्ं सुखाचं आपणही गुणगुणायचं, आज मितीला तू,तुलाच सावरायचं|| नसतील आज नाती नात्यात गुंतून जायला, नसतील आज मेघही तुझ्यावर बरसायला| आसवेच आपुली [...]

Read Full Post »

‘ऋणानुबंधांची गाठ’

रात्री तुम्हाला निरोप देताना, माझ्या डोळ्यात आसवं नसतीलही… आपण उद्या पुन्हा भेटणार या पोकळ भावनेनं अश्रू काही काळ थबकले असतील… पण पहाटेच्या मंद झुळुकेनं मला भानावरच आणलं, आणि शब्द जणू अश्रूतून ओघळू लागले… ते विनायकचं बोलणं,रवीची धीरगंभीरता, सुशांतची चिडचिड,गोव्याची बडबड,दादांच्या गझला… हे सगळं पुन्हा केव्हा एकत्र येणार? का हीच या ऋणानुबंधांची अखेरची गाठ असणार? इतके [...]

Read Full Post »

‘अस्तित्व’

आता तुझं नसणंच तुझ्या अस्तित्वाची साक्ष देईल… नसणा-या अस्तिवात तुला शोधताना काळाचं अस्तित्वही संपून जाईल.

Read Full Post »

‘तुझं रूप’

कर्णिकेच्या परिमलानं गंधलेलं तुझं रूप, दवात चिंब ओलावलेलं तुझं रूप, फिकट रंगात सोनेरी पहाट खुलवणारं तुझं रूप, निसर्गाच्या लावण्याची उधळ्ण करणारं तुझं रूप, दाहकतेच्या जाणिवेनंही कळवंडणारं तुझं रूप, कोमेजलेल्या त्या स्पर्शातही सुगंधित करणारं तुझं रूप. २० फेब्रुवारी,२००४ सांगवी

Read Full Post »

Older Posts »

Follow

Get every new post delivered to your Inbox.