खरंच एकतरी कारण रहायला हवं होतं,
तुझ्या स्वराशिवाय माझ्या शब्दांनी गायला हवं होतं|
शब्द-सूर सगळेच विखुरले,
वादळापूर्वी पावसाचं गाणं तरी गुणगुणायला हवं होतं|
हे रेशीमबंध नुसतेच जुळत गेले,
तुझी होईन का?शेवटचं विचारायला हवं होतं|
माझ्याभोवती तुझे अतृप्त श्वास घुटमळले,
एकदा तरी त्यात उर भरुन जगायला हवं होतं|
श्वासागणिक जुळताना मुळं रूजतंच गेली,
ते उमाळे जागवायला मन रितं व्हायला हवं होतं|
आता कोरडं दुःख घेऊन का जाळताय?
यापूर्वीच काळजानं खाक व्हायला हवं होतं||
११ जून,२००५
सांगवी






कर्णिकेच्या परिमलानं गंधलेलं तुझं रूप,